November 4, 2025 1:01 PM | FIDE Chess WorldCup

printer

FIDE Chess WorldCup : नारायणन एस एल, दीप्तायन घोष, आरण्यक घोष यांचा दुसऱ्या फेरीत प्रवेश

फिडे बुद्धिबळ विश्वचषक  स्पर्धेत भारताचे ग्रँडमास्टर नारायणन एस एल, दीप्तायन घोष यांच्यासह आरण्यक घोष यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. गोव्यात पणजी इथं सुरू असलेल्या या स्पर्धेतून विश्वनाथन आनंद चषकासाठी पन्नास खेळाडूंची निवड होणार आहे. यापूर्वी सहा भारतीय खेळाडूंनी दुसऱ्या फेरीत स्थान मिळवलं आहे. ८२ देशांमधल्या २०६ खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.