November 26, 2025 7:53 PM | FIDE Chess World Cup

printer

उझबेकिस्तानचा ग्रँडमास्टर जावोखीर सिंदारोव्हला फिडे विश्वचषक स्पर्धेचं अजिंक्यपद

उझबेकिस्तानचा ग्रँडमास्टर जावोखीर सिंदारोव्ह यानं फिडे विश्वचषक स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं आहे. अवघ्या १९व्या वर्षी ही कामगिरी करणारा तो सर्वात कमी वयाचा बुद्धिबळपटू ठरला आहे. गोव्यातल्या अरपोरा इथं झालेल्या या स्पर्धेत त्यानं चीनचा ग्रँडमास्टर वेई यी याला हरवलं. सिंदारोव्ह, वेई यी आणि रशियाचा आंद्रे एसिपेंको हे तिघेही पुढच्या वर्षी होणाऱ्या कँडिडेट्स टूर्नामेंटसाठी पात्र ठरले आहेत. या स्पर्धेत विजयी होणारा बुद्धिबळपटू विद्यमान विश्वविजेता, ग्रँडमास्टर डी. गुकेश याला आव्हान देईल.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.