बुद्धिबळामध्ये फिडे विश्वचषक स्पर्धेत, भारताच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. ग्रॅण्डमास्टर डी. गुकेश, अर्जून एरिगेसी, दीप्तायन घोष,कार्तिक वेंकटरमण आणि पेंटला हरिकृष्णा यांनी स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. दीप्तायन घोषने जागतिक विजेता इयान नेपोमनियाला पराभूत करत आश्चर्याचा धक्का दिला. डी. गुकेशने कझाकस्तानच्या खेळाडूचा दीड विरुद्ध अर्धा गुण असा तर अर्जुनने बल्गेरियाच्या प्रतिस्पर्ध्याचा २ विरुद्ध शून्य असा पराभव केला.
तर आठ भारतीय खेळाडू आज दुसऱ्या फेरीत टायब्रेकमधे खेळतील. यात आर प्रज्ञानंद, विदित गुजराथी, निहाल सरीन, प्रणव व्ही, एस एल नारायणन, कार्तिकेयन मुरली, प्रणेश एम आणि रौनक साधवाणी यांचा समावेश आहे.