फिडे महिलांच्या विश्व बुद्धिबळ स्पर्धेत 4 भारतीय खेळाडूंचा तिसऱ्या फेरीत प्रवेश

जॉर्जियामध्ये बातुमी इथं फिडे महिलांच्या विश्व बुद्धिबळ स्पर्धेत चार भारतीय खेळाडूंनी तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. सर्वोच्च मानांकित ग्रँडमास्टर कोनेरु हंपी, द्रोणवल्ली हरिका, आर. वैशाली आणि दिव्या देशमुख यांनी आपलं आव्हान राखलं आहे.