पंजाबचे ११४ वर्षीय मॅरेथॉन धावपटू फौजा सिंग यांचं जालंधर जिल्ह्यातल्या बियास गावी एका रस्ता दुर्घटनेत निधन झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सामाजिक माध्यमांवरून त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
ते त्यांच्या फिटनेसमुळे तरूणांसाठी नेहमीच प्रेरणादायी व्यक्तिमत्व राहिले आहेत. ते खिलाडू वृत्तीचे आणि दृढनिश्चयी व्यक्तिमत्व होते असंही प्रधानमंत्री म्हणाले. तर फौजा सिंग हे एक आशादायी व्यक्तिमत्व असल्याची भावना पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांनी व्यक्त केली.