राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्गांसाठी आता फास्टॅग वार्षिक पास उपलब्ध होणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या राजमार्गयात्रा या मोबाईल ॲपवरून बिगर वाणिज्यिक वापराच्या वाहनांसाठी हा पास घेता येईल. या ॲपवर वाहन क्रमांक आणि संपर्क तपशिलाची नोंद करून इतरांनाही हा पास भेट म्हणून देता येईल. एका वर्षासाठी वैध असलेल्या या पासचा वापर अवघ्या ३ हजार रुपयांत देशभरातल्या १ हजार १५० टोल नाक्यांवर करता येणार आहे.
Site Admin | October 18, 2025 8:06 PM | FASTag Annual Pass
राष्ट्रीय आणि द्रुतगती मार्गांसाठी आता ‘फास्टॅग वार्षिक पास’
