October 4, 2025 8:12 PM | FAST tag

printer

FASTag: राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियमांमध्ये बदल

केंद्र सरकारनं राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियमांमध्ये बदल केले असून त्यानुसार वैध आणि सक्रिय फास्टटॅग शिवाय टोल प्लाझा मध्ये प्रवेश करणाऱ्या वाहनांंनी रोख रक्कम भरण्याचा पर्याय निवडल्यास त्यांना दुप्पट शुल्क भरावं लागेल. तर युपीआयच्या माध्यमातून शुल्क भरण्याचा पर्याय निवडला तर सव्वा पट शुल्क भरावं लागेल. हे नियम येत्या १५ नोव्हेंबर पासून लागू होतील. या  सुधारणांमुळे शुल्क संकलन मजबूत होईल, डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन मिळेल आणि टोल कामकाजात पारदर्शकता वाढेल.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.