राज्यातले शेतरस्त्याचे सर्व वाद महसूल सप्ताहात मिटवून येत्या पाच वर्षात प्रत्येक शेताला १२ फुटांचा रस्ता उपलब्ध करुन देणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. येत्या १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत आयोजित केल्या जाणाऱ्या महसूल सप्ताहाबाबत त्यांनी आज मंत्रालयात बातमीदारांना माहिती दिली. राज्यात ठाणे आणि उल्हासनगर वगळता इतर ३५ शहरांमध्ये सुमारे पाच लाख विस्थापित सिंधी परिवार राहतात, त्यांना मालमत्तापत्र दिलं जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
Site Admin | July 30, 2025 7:15 PM
प्रत्येक शेताला १२ फुटांचा रस्ता मिळणार – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
