डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

खोट्या बातम्या आणि दिशाभूल करणारी माहिती ही समाजातली अपप्रवृत्ती असून तिला वेळीच आळा घालणं अत्यावश्यक आहे – डॉ. एल. मुरुगन

खोट्या बातम्या आणि दिशाभूल करणारी माहिती ही समाजातली अपप्रवृत्ती असून तिला वेळीच आळा घालणं अत्यावश्यक आहे, असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांनी आज राज्यसभेत सांगितलं. या संदर्भातल्या पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पत्र सूचना कार्यालयाअंतर्गत २०१९ मध्ये सुरु केलेल्या तथ्य तपासणी विभागानं आतापर्यंत ९ हजार ९२२ संदेश बनावट बातम्या म्हणून उघड केले आहेत. असं त्यांनी सांगितलं. केंद्र सरकारशी संबंधित कोणत्याही बातम्यांची शहानिशा करून त्या खऱ्या आहेत की खोट्या हे केवळ सरकारच ठरवू शकतं असं केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या चर्चेदरम्यान सांगितलं तर प्रसारमाध्यमं हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याचं राज्यसभेचे सभापती, उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले.