भंडाऱ्यामध्ये लाखनी इथं कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रात सुमारे १२९ मेट्रिक टन बोगस मिश्र खतांचा साठा आढळून आला आहे. मिश्र खताच्या नमुन्याची अमरावतीमधल्या खत नियंत्रण प्रयोगशाळेत तपासणी केली असता नमुने अप्रमाणित ठरले आहेत. विशेष म्हणजे संबंधित खत उत्पादन कंपनी आणि वितरक तसेच विक्रेत्यांकडे महाराष्ट्र राज्यातील खत उत्पादन आणि विक्री संबंधीचे कोणतेही परवाने नसल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे.
Site Admin | May 28, 2025 3:37 PM | Bhandara
भंडाऱ्यामधे कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रात १२९ मेट्रिक टन बोगस खतांचा साठा जप्त
