डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

June 2, 2025 3:08 PM | Dhule

printer

धुळ्यात कपाशीचं बनावट बियाणं जप्त

धुळे कृषी विभागाच्या पथकाने धुळे शहरात आज सकाळी खाजगी बसेस आणि वाहनांवर छापे टाकून २० लाख रुपये किमतीचं कपाशीचं बनावट आणि राज्यात प्रतिबंध असलेलं बियाणं जप्त केलं आहे. पथकातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रात्रभर गस्त घालताना मिळालेल्या माहितीच्या आधाराने वेष बदलून ही कारवाई तडीस नेली. हे बियाणं गुजरातमधून महाराष्ट्रात विक्रीसाठी आणलं जात होतं आणि त्यात बाराशे ते तेराशे पाकिटांचा समावेश होता .