डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

March 24, 2025 3:27 PM

printer

नागपूर हिंसाचार प्रकरणातला प्रमुख आरोपी फहीम खानच्या घरावर कारवाई

नागपूर हिंसाचार प्रकरणातला प्रमुख आरोपी फहीम खान याचं दुमजली घर पाडण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी नागपूर महानगरपालिकेने खान याच्या घराचा इमारत आराखडा मंजूर नसल्यामुळे त्याचं घर अनधिकृत असल्याच्या कारणामुळे नोटीस बजावली होती. आज सकाळी पालिकेने खानच्या घरावर कारवाई केली. या संपूर्ण परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. १७ मार्च रोजी औरंगजेबाच्या कबरीसंदर्भात पसरलेल्या अफवेमुळे हिंसाचार झाला होता. या हिंसाचारात १०० हून जास्त जणांना अटक करण्यात आली असून फहीम हा या प्रकरणाचा मुख्य आरोपी आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा