December 6, 2025 3:02 PM | F I H hocky

printer

पुरुषांच्या एफ आय एच ज्युनिअर विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताचा उपांत्य फेरीत प्रवेश

पुरुषांच्या एफ आय एच ज्युनिअर विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारतानं काल आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या बेल्जीयमच्या संघाला पराभूत करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. चेन्नईमध्ये झालेल्या या सामन्यात खेळाची वेळ संपली तेव्हा दोन्ही संघ २-२ असे बरोबरीत होते. त्यानंतर झालेल्या पेनल्टी शूटआऊटमध्ये भारतीय संघानं बेल्जीयमच्या संघाला ४-३ असं पराभूत केलं.