परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर दोन दिवसांच्या जपान दौऱ्यावर

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर दोन दिवसांच्या जपान दौऱ्यासाठी आज सकाळी टोक्यो इथं पोहोचले. जपानमधले भारताचे राजदूत सिबी जॉर्ज यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. जयशंकर यांनी एदोगावा इथल्या फ्रीडम प्लाझा इथं महात्मा गांधींच्या पुतळ्याचं अनावरण केलं. गांधीजींचा शांततेचा संदेश आजही तितकाच कालसुसंगत असल्याचं प्रतिपादन जयशंकर यांनी यावेळी बोलताना केलं. जपानचे परराष्ट्र मंत्री योको कामीकावा यांच्या निमंत्रणावरून उद्या होणाऱ्या क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत भाग घेण्यासाठी डॉ. जयशंकर जपानला गेले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँथनी ब्लिंकन यांची भेट घेतली आणि स्थानिक, तसंच जागतिक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली.