डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस.जयशंकर यांनी घेतली चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट

 

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस.जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची आज अस्ताना इथं भेट घेतली. सीमाभागातल्या समस्यांवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने लष्करी आणि राजनैतिक प्रयत्न करण्याबाबत यावेळी दोघांमध्ये चर्चा झाली. एलएसी अर्थात लाइन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलचं पालन करत सीमा भागात शांतता राखणं आवश्यक आहे, असं जयशंकर या बैठकीनंतर म्हणाले. परस्परांचा आदर, संवेदनशीलता आणि समान हितसंबंध यावर भारत आणि चीनचे संबंध अवलंबून असतील असंही ते म्हणाले.