डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

परराष्ट्र व्यवहार मंत्री कालपासून पाच दिवसांच्या ओडिशा दौऱ्यावर

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर कालपासून पाच दिवसांच्या ओडिशा दौऱ्यावर असून, त्यांनी ओडिशाच्या पुरी आणि भुवनेश्वर इथल्या विविध पर्यटनस्थळांना भेटी दिल्या.

 

जयशंकर यांनी कोनार्कच्या सूर्य मंदीर, जगन्नाथ मंदीर, धौली शांती स्तूप तसंच भुवनेश्वर इथं 11 व्या शतकातल्या लिंगराज मंदिरालाही भेट दिली. भुवनेश्वर इथं होणाऱ्या 18 व्या प्रवासी भारतीय दिवस अधिवेशनाला ते आज उपस्थित राहाणार आहेत.