जागतिक स्तरावर आजच्या काळात सर्वसमावेशकता मजबूत होणं गरजेचं असून संयुक्त राष्ट्रसंघानही त्याला पाठिंबा द्यायला हवा. असं मत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्रसंघाला ८० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आज दिल्लीत त्यांच्या हस्ते एका विशेष टपाल तिकीटाचं अनावरण करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. भारतानं शांतता आणि सुरक्षेला त्याचप्रमाणे प्रगती व विकासाला नेहमीच महत्त्व दिलं आहे. असंही ते म्हणाले.
Site Admin | October 24, 2025 3:05 PM | External Affairs Minister Dr S Jaishankar
जागतिक स्तरावर आजच्या काळात सर्वसमावेशकता मजबूत होणं गरजेचं-डॉ. एस जयशंकर