डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

भारत-जर्मनी धोरणात्मक संबंध वाढवण्यावर दोन्ही देशांनी घेतली शपथ

परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉक्टर एस.जयशंकर यांनी आज बर्लिन इथं जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्झ यांची भेट घेतली.  दहशतवादाविरोधात भारत देत असलेल्या लढ्यात जर्मनीनं दिलेल्या साथीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यातर्फे त्यांचे आभार मानले. भारत-जर्मनी धोरणात्मक भागीदारी वाढवण्यासाठी आणि विस्तारित करण्यासाठी मर्झ यांच्या सरकारसोबत काम करण्यास उत्सुक असल्याचं जयशंकर यांनी त्यांना सांगितलं.

 

जयशंकर यांनी जर्मनीचे परराष्ट्र आणि सुरक्षा निती सल्लागार डॉक्टर गुंटर साउटर यांची भेट घेत चर्चा केली. दहशतवादाविरोधात लढण्यासह काही मुख्य जागतिक मुद्य्यांवर उभयतांमध्ये चर्चा झाली. जागतिक पातळीवर असलेल्या अनिश्चित वातावरणात भारत आणि जर्मनीत वाढती भागीदारी ही महत्त्वाची आहे, असं मत जयशंकर यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात नमूद केलं आहे. जर्मनीच्या अर्थ आणि ऊर्जामंत्री कॅथरिन रिचे यांचीही जयशंकर यांनी भेट घेत चर्चा केली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.