November 2, 2024 7:14 PM | EAM Dr S Jaishankar

printer

आजच्या काळात भारतानं जगाचा मित्र म्हणून स्वतःचं स्थान निर्माण केलं -परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर

आजच्या काळात भारतानं जगाचा मित्र म्हणून स्वतःचं स्थान निर्माण केलं असल्याचं असं प्रतिपादन परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं एका पुस्तक प्रकाशनाच्या समारंभात बोलत होते. आज भारत जास्तीत जास्त देशांशी मैत्री करू इच्छितो, त्याचवेळी काही मित्र इतरांपेक्षा अधिक गुंतागुंत निर्माण करणारेही असू शकतात, तर काही मित्रांसोबत संस्कृतिक किंवा राजनैतिक शिष्टाचाराच्या बाबतीत परस्पर सामायिक करण्यासारखी परिस्थिती नसू शकते ही बाबही त्यांनी नमूद केली.  आपल्या भागिदार देशांचं मूल्यांकन करताना  सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता यांसारख्या संवेदनशील घटक कायमच महत्वाचे असतात असं ते म्हणाले.