डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

उद्योगविश्व भारतात गुंतवणुकीसाठी उत्सुक असल्याचं परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचं प्रतिपादन

जागतिक उद्योगक्षेत्राबरोबरच, जागतिक नेत्यांचाही भारताविषयीचा विश्वास वाढला आहे. जागतिक उद्योगविश्व भारतात गुंतवणुकीसाठी उत्सुक आहे. सुसज्ज सुविधांसोबतच महाराष्ट्र हे भौगोलिकदृष्ट्या गुंतवणुकीसाठी सर्वाधिक योग्य राज्य असल्याची जागतिक उद्योगांची भावना आहे. त्यामुळे विकसित भारत संकल्पनेच्या पूर्ततेमध्ये महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे.   राज्य आणि केंद्र सरकार जिथे एकत्र काम करतात ती  उद्योगांची सहाजिकच पहिली पसंती असते असं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी आज केलं. मुंबईत भाजपा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  

 

मोदी सरकारच्या तिसऱ्या पर्वात विकसित महाराष्ट्राच्या संकल्पपूर्तीसाठी समर्पितपणे वेगवान काम सुरू असून त्यासाठी महाराष्ट्राचा विकास वेगवान असायलाच हवा. स्वातंत्र्यानंतर उद्योग, तंत्रज्ञान, विमानतळ, रेल्वे वाहतूक, बुद्धिमत्ता, भौगोलिक सुविधा यांमध्ये महाराष्ट्र कायम आघाडीवर राहिला आहे. असंही त्यांनी सांगितलं.