भारत कोणत्याही एकतर्फी निर्बंधंचं समर्थन करत नाही, असं परराष्ट्र मंत्रालयानं काल स्पष्ट केलं. गुजरातच्या वाडिनार इथं रॉसनेफ्टच्या रिफायनरीवर युरोपीय संघानं घातलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ही भूमिका मांडली.
भारत एक जबाबदार देश असून कायद्याचं पालन करतो, असं ते म्हणाले. भारताच्या नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी ऊर्जा सुरक्षा ही सर्वात महत्त्वाची आहे, असंही जयस्वाल यांनी नमूद केलं. विशेषतः ऊर्जा व्यापाराबाबत दुटप्पी भूमिका असता कामा नये, असं आग्रही प्रतिपादन त्यांनी केलं.