इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये ९ फेब्रुवारी या एकाच दिवशी पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी शाळा नोंदणी आणि विद्यार्थी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी १७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यात वाढ करण्यात आली असून विद्यार्थ्यांना आता विलंब शुल्क, अतिविलंब शुल्क आणि अति विशेष विलंब शुल्कासह ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार असल्याचं राज्य परीक्षा परिषदेनं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात सांगण्यात आलं आहे.