August 30, 2024 7:35 PM | Maharashtra Rain

printer

मोसमी पावसाचा मुक्काम यंदा लांबण्याची हवामान विभागाची शक्यता

मोसमी पावसाचा मुक्काम यंदा लांबण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. साधारणपणे सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून परतीचा मान्सून सुरु होतो. परंतु यंदा‘ला निना’च्या प्रभावामुळे तयार होणाऱ्या कमी दाबामुळे सप्टेंबरअखेर किंवा ऑक्टोबरपर्यंत मान्सून लांबण्याची शक्यता आहे. मान्सूनचा मुक्काम वाढला तर खरीप पिकांना त्याचा फायदा होणार असून, खरीप लागवडीचं क्षेत्रही त्यामुळे वाढणार आहे.