देशाच्या वस्तू आणि सेवा निर्यातीत मागील वर्षीच्या तुलनेत १२ पूर्णांक ७ दशांश टक्क्यांची वाढ झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं सांगितलं आहे. या वर्षी एप्रिल महिन्यात ७३ अब्ज ८० कोटी डॉलर्सची निर्यात करण्यात आली. मागील वर्षी याच काळात ६५ अब्ज ४८ कोटी डॉलर्स इतकी निर्यात झाली होती. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं संकलित केलेल्या आकडेवारीनुसार, देशाच्या वस्तू निर्यातीत या महिन्यात ९ पूर्णांक ३ शतांश टक्क्यांनी वाढ होऊन ती ३८ अब्ज ४९ कोटी डॉलर्स झाली आहे. एप्रिल मधे देशाची एकूण वस्तू आणि सेवांची आयात ८२ अब्ज ४५ कोटी असून मागील वर्षीच्या तुलनेत ती १५ पूर्णांक ७२ शतांश टक्क्यांनी वाढली आहे.
Site Admin | May 16, 2025 3:50 PM
देशाच्या वस्तू आणि सेवा निर्यातीत यंदा १२ टक्क्यांची वाढ
