देशाच्या वस्तू आणि सेवा निर्यातीत साडेपाच टक्के वाढ नोंदली गेली आहे. एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या काळात भारताने ८२० अब्ज ९३ कोटी डॉलर्स किमतीचा माल निर्यात केला. त्याआधीच्या आर्थिक वर्षात निर्यात झालेल्या मालाचं मूल्य ७७८ अब्ज १३ कोटी डॉलर्स होतं. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयातर्फे जाहीर झालेल्या या आकडेवारीनुसार देशाची व्यापारी तूट २१ अब्ज ५४ कोटी डॉलर्सची राहिली.
Site Admin | April 16, 2025 3:34 PM | exports
देशाच्या वस्तू आणि सेवा निर्यातीत साडेपाच टक्के वाढ
