भारत आणि श्रीलंका मित्र शक्ती संयुक्त लष्करी सरावाची अकरावी आवृत्ती सुरू

भारत आणि श्रीलंका या देशांमधल्या मित्र शक्ती २०२५ या संयुक्त लष्करी सरावाची अकरावी आवृत्ती कर्नाटकात बेळगाव इथे सुरू आहे. हा सराव गेल्या सोमवारपासून सुरू झाला असून येत्या २३ तारखेपर्यंत चालणार आहे. या सरावात आजच्या चौथ्या दिवशी ड्रोन ड्रील्ससह विविध लष्करी कवायतींचं व्यावहारिक प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. तसंच शोधमोहिम आणि नवीन तंत्रज्ञान असलेल्या उपकरणांचं प्रात्यक्षिकही सादर झालं. दोन्ही देशांमधली कायमस्वरुपी संरक्षण भागीदारी, कार्यक्षमता आणि परस्पर विश्वास अधोरेखित करणारा हा सराव असल्याचं भारतीय लष्कराने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.