शाळा प्रवेश आणि परीक्षा शुल्क भरण्यासाठी युपीआयचा वापर करण्याचं शिक्षण मंत्रालयाचं शाळांना आवाहन
शाळा प्रवेश आणि परीक्षा शुल्क गोळा करण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील शाळांनी युपीआयचा वापर करण्याचं आवाहन शिक्षण मंत्रालयानं शाळांना केलं आहे. राज्य, केंद्रशासित प्रदेश तसंच एनसीइआरटी, सीबीएससी, केंद्रीय विद्यालय संघटना, राष्ट्रीय विद्यालय संघटनांसारख्या स्वायत्त संस्थांना पत्राद्वारे हे आवाहन करण्यात आलं आहे. शाळांमधील कायदेविषयक, धोरणात्मक आणि संस्थात्मक सुधारणांच्या माध्यमातून जीवन आणि शिक्षण सुलभतेला प्रोत्साहन देण्याच्या व्यापक प्रयत्नांचा हा भाग आहे.