डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

धुळे शहरात माजी आमदार अनिल गोटे यांचं बेमुदत उपोषण आंदोलन

धुळे शहरात प्रस्तावित नविन रस्ता तयार करण्याच्या कामात अडथळा आणणार्‍या यंत्रणेविरोधात माजी आमदार अनिल गोटे यांनी आज बेमुदत उपोषण आंदोलन सुरु केलं. धुळे शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन ते कृषी महाविद्यालयपर्यंत रस्ता रुंदीकरण करण्याच्या आणि अधिकरणाच्या कामासाठी ४२ कोटींचा निधी देण्यात आला आहे. मात्र, कृषी महाविद्यालयाच्या जागेचं अधिग्रहण करण्यात अडथळे आणले जात आहेत. काही खाजगी शेत जमीनीही अधिग्रहीत करण्यात येणार आहेत, त्यालाही प्रशासनाकडून सहकार्य मिळत नाही यामुळे रस्त्याचे काम रखडलं असून मंजूर झालेला ४२ कोटी रुपयांचा निधी परत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे माजी आमदार अनिल गोटे यांनी या रस्ते कामात अडथळा आणणार्‍या कृषी विभागाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागातल्या यंत्रणा याविरुध्द आंदोलनाला सुरुवात केली. आंदोलनाला संभाजी ब्रिगेडने पाठींबा दिला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.