युरोपीय संघाच्या अध्यक्ष उर्सुला व्हॉन डेअर लाईएन यांचं भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत आगमन

युरोपीय संघाच्या अध्यक्ष उर्सुला व्हॉन डेअर लाईएन यांचं आज दुपारी भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत आगमन झालं. येत्या सोमवारी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात युरोपीय मंडळाचे अध्यक्ष अंतोनियो लुईश सांतूश दा कोस्ता यांच्यासोबत त्या प्रमुख पाहुण्या म्हणून सहभागी होतील. लाईएन यांच्या या दौऱ्यात भारत आणि युरोपीय महासंघ यांच्यातल्या धोरणात्मक भागीदारीच्या पुढच्या टप्प्याबद्दल चर्चा होईल, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. त्यानंतर २७ जानेवारी रोजी १६व्या भारत-युरोपीय संघ परिषदेचं अध्यक्षपदही हे दोन्ही नेते भूषवणार आहेत.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.