डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

युरोपिय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डर लेयन भारत दौऱ्यावर

युरोपिय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डर लेयन आजपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. लेयन यांचा हा तिसरा भारत दौरा असून त्या आज संध्याकाळी परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांची भेट घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या युरोपियन आयोगाच्या अध्यक्षांसोबत शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा करतील. भारत आणि युरोप 2004 पासून धोरणात्मक भागीदार आहेत आणि त्यांचे द्विपक्षीय संबंध विविध क्षेत्रात विस्तारले आणि दृढ झाले आहेत. या दौऱ्यामुळे द्विपक्षीय संबंध अधिक भक्कम होण्याचा मार्ग मोकळा होईल.