युरोपात लागलेल्या वणव्यात १० लाख हेक्टरपेक्षा जास्त वनक्षेत्राचं नुकसान झालं आहे. हा युरोपातला २०२५ या वर्षातला आतापर्यंतच्या सर्वात भीषण वणवा मानला जात असून, २०२४ मधल्या वणव्यात झालेल्या नुकसानीच्या तुलनेत हे प्रमाण चार पटीनं जास्त असल्याचं वृत्त आहे.
हवामान बदलामुळे या वणव्याची तीव्रता जास्त असल्याचं मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. युरोपीय महासंघ क्षेत्रात आत्तापर्यंत १८०० पेक्षा जास्त वणव्यांची नोंद झाली असून, यामुळे ३८ दशलक्ष टनांपेक्षा जास्त कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन झालं असून, पर्यावरणावर गंभीर परिणाम होत असल्याचंही तज्ञांनी म्हटलं आहे.