युरोपात सध्या उष्णतेची लाट आली असून ठिकठिकाणी तापमापकातला पारा नवनवे उच्चांक गाठत आहे. दक्षिण स्पेनमधे पाऱ्याने ४६ अंशांची कमाल पातळी गाठली आहे. पोर्तुगाल, इटली आणि क्रोएशियात ठिकठिकाणी उष्णतेचे रेड अलर्ट देण्यात आले आहेत. युरोपात हा आतापर्यंतचा सर्वात उष्ण जून महिना ठरण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. लंडनमधे आज तापमान ३५ अंशापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
Site Admin | June 30, 2025 2:34 PM | Europe
युरोपात उष्णतेची लाट
