युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष अर्सुला फॉन दॅ लीन यांना या आठवड्यात दोन वेळा अविश्वास ठरावाला सामोरं जावं लागलं. पेट्रियट्स फॉर युरोप आणि डावे पक्ष अर्सुला यांच्यावर स्वतंत्रपणे अविश्वास प्रस्ताव आणणार आहेत. युरोपियन युनियन आणि अमेरिका व्यापार करार तसंच युरोपियन युनियन मर्कोसर करार हाताळणी व्यवस्थित न केल्याचा तसंच युरोपच्या हितसंबंधांशी तडजोड केल्याचा त्यांच्यावर सर्व राजकीय पक्षांकडून आरोप होत आहे. अविश्वास प्रस्तावावर आज संसदेत चर्चा होत असून गुरुवारी मतदान होणार आहे.
Site Admin | October 6, 2025 8:14 PM
युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष अर्सुला फॉन दॅ लीन यांच्यावर दोन वेळा अविश्वास ठरावाला