November 25, 2025 1:40 PM | Ethiopian volcanic

printer

इथिओपियातल्या हायली गुब्बी ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे विमानसेवांवर परिणाम

इथिओपियातल्या हायली गुब्बी ज्वालामुखीच्या राखेमुळे मस्कत आणि आसपासचे विमान वाहतूक क्षेत्र प्रभावित झालं असून सर्व भारतीय विमान वाहतूक कंपन्यांनी हे क्षेत्र टाळावं तसंच अशा परिस्थितीत सर्व प्रकारे काटेकोरपणे बाळगावी असा इशारा नागरी हवाई वाहतूक  महासंचालनालयानं दिला आहे. ज्वालामुखीचा उद्रेक किंवा राखेचा ढग यामुळं विमानांसाठी धोका निर्माण होतो, तेव्हा देण्यात येणारा अष्टम हा विशेष संदेशही भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि टूलूस येथील ज्वालामुखी राख सल्लागार केंद्रानं जरी केला आहे.

 

इथिओपियामधल्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून वर आलेल्या राखेचे ढग भारतीय आकाशात पोहोचल्यानं बऱ्याच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा रद्द करण्यात आल्या आहेत.

 

ही राख भारताकडून चीनच्या दिशेनं सरकत आहे, असं भारतीय हवामानशास्त्र विभागानं म्हटलं आहे. या राखेमुळे विमान वाहतुकीवर परिणाम झाला असला तरी हवामानावर काही विपरीत परिणाम दिसून आलेला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.