इथिओपियामध्ये प्रवाशांनी भरलेला ट्रक नदीत कोसळल्यानं ७१ जणांचा मृत्यू

इथिओपियामध्ये प्रवाशांनी भरलेला ट्रक नदीत कोसळल्यानं किमान ७१ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ६८ पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. इथिओपियाची राजधानी अदिस अबाबापासून सुमारे ३०० किलोमीटरवर असलेल्या सिदामा मध्ये काल हा अपघात झाला.