डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

इथेनॉल मिश्रणाचं ध्येय २० टक्क्यांवर नेण्याचा भारताचा विचार

केंद्रीय पेट्रोलियम आणि भूगर्भ वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी इथेनॉल मिश्रणाचं ध्येय 20 टक्क्यांहून अधिक वाढवण्याचा विचार सुरु असल्याचं म्हटलं आहे. गुवाहाटी इथं ॲडव्हांटेज आसाम द्वितीय गुंतवणूक शिखर परिषदेत बोलताना त्यांनी सांगितलं की देशात 19 पूर्णांक 6 टक्के इथेनॉल मिश्रणाचा दर आधीच गाठला आहे. विकासात्मक आव्हानं असली तरी, भारतातील सर्व जीवाश्म इंधन उत्पादन कंपन्या 2045 पर्यंत शून्य उत्सर्जन साध्य करतील अशी अपेक्षा असल्याचं पुरी म्हणाले.