डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

उदयोन्मुख विज्ञान आणि तंत्रज्ञान नवोन्मेष परिषदेचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार

उदयोन्मुख विज्ञान आणि तंत्रज्ञान नवोन्मेष परिषदेचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तीन दिवसांच्या या परिषदेत शिक्षण संस्था, संशोधन संस्था, उद्योग जगत, सरकारी यंत्रणा यांच्या प्रतिनिधींसह नोबेल पुरस्कार विजेते, नामवंत शास्त्रज्ञ, नवोन्मेषक आणि धोरणकर्ते सहभागी होणार आहेत. आधुनिक उत्पादन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धीमत्ता, जैव उत्पादन, नील अर्थव्यवस्था, इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर उत्पादन, कृषी तंत्रज्ञान, उर्जा, पर्यावरण आणि हवामान बदल, आरोग्य तंत्रज्ञान, क्वांटम विज्ञान आणि अवकाश तंत्रज्ञान इत्यादी प्रमुख क्षेत्रातील नवोन्मेषाबाबत या परिषदेत विचारविनिमय केला जाईल.

 

नवी दिल्लीत भारत मंडपम इथं होणाऱ्या या परिषदेत पंतप्रधानांच्या हस्ते 1 लाख कोटी रुपयांच्या संशोधन विकास आणि नवोन्मेष योजना निधीचंही वितरण केलं जाणार आहे. देशातल्या खाजगी क्षेत्रातील संशोधन आणि विकास परिसंस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.