डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत निबंध स्पर्धांच आयोजन

भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं संरक्षण मंत्रालय आणि माय जी.ओ.व्ही. इंडिया या संकेतस्थळानं संयुक्तपणे देशभरातल्या युवा वर्गासाठी विविध स्पर्धांचं आयोजन केलं आहे. आजपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. 

 

याअंतर्गत ऑपरेशन सिंदूर – दहशतवादाविरोधातल्या भारताच्या धोरणाची नवी परिभाषा या विषयावरच्या निबंध स्पर्धंच आयोजन केलं आहे. या स्पर्धेतल्या  पहिल्या तीन विजेत्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाईल, तसंच त्यांना नवी दिल्ली इथं होणाऱ्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहण्याची संधी मिळणार आहे. माय जी.ओ.व्ही. या संकेतस्थळावर या स्पर्धेसाठी नोंदणी करता येईल.

 

याशिवाय समाजमाध्यमांवरील इन्फ्लुएन्सरसाठीही भारताच्या स्वातंत्र्याशी संबंधित कोणत्याही ठिकाणाला भेट देऊन, त्यासंबंधीचे  व्हिडिओ आणि रील्स बनवण्याचीही स्पर्धा आयोजित केली आहे. याअंतर्गत स्पर्धकांना न्यू इंडिया, एम्पॉवर इंडिया आणि इंडिपेंडन्स ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह हे हॅशटॅग वापरून आपले रील्स आणि व्हिडिओ समाजमाध्यमांवर पोस्ट करता येतील. या स्पर्धेतही पहिल्या तीन विजेत्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल.

 

याबरोबरच  नया भारत सशक्त भारत या संकल्पनेवरच्या चित्रकला स्पर्धेचंही आयोजन केलं आहे. याअंतर्गत स्पर्धकांना चित्रकलेच्या माध्यमातून देशाची प्रगती आणि यशाचं दर्शन घडवण्याची संधी असेल. या स्पर्धेबद्दलची अधिक माहिती माय जी.ओ.व्ही. या संकेतस्थळावर दिली आहे.

 

या स्पर्धा सर्वांसाठी खुल्या असून, स्पर्धकांना येत्या ३० जुन पर्यंत स्पर्धांसाठी नोंदणी करता येणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा