इंडोनेशियाच्या सर्वात सक्रिय ज्वालामुखींपैकी एका ज्वालामुखीचा काल उद्रेक झाला असून त्याचा लाव्हा 11 किलोमीटर पेक्षा जास्त उंच उसळत आहे. हा आत्तापर्यंतचा उच्चांक असल्याचं ज्वालामुखी शास्त्रीय संस्थेनं म्हटलं आहे. सुरुवातीला राखेचा मोठा ढीग आसमंतात फेकला गेला आणि त्यानंतर तो फ्लोरेस या पर्यटन बेटावर पसरला. या घटनेतील नुकसान आणि जीवित हानिविषयी अद्याप कोणतीही माहिती हाती आलेली नाही. या आधी नोव्हेंबर मध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता ज्यामध्ये 9 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आणि हजारो नागरिकांना स्थलांतरित व्हावं लागलं होतं.