डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

July 20, 2024 8:44 PM | EPFO

printer

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यसंख्येत मे महिन्यात १९ लाख ५० हजारांची भर

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यसंख्येत गेल्या मे महिन्यात १९ लाख ५० हजारांची भर पडली आहे. मे २०२४मधे नवीन ९ लाख ८५ हजार पगारदारांनी संघटनेचं सदस्यत्व घेतलं. गेल्या वर्षीच्या मे महिन्यात नोंदल्या गेलेल्या सदस्यसंख्येच्या तुलनेत ही संख्या साडे अकरा टक्क्यांनी जास्त आहे.