ईपीएफओ, अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने यंदाच्या जुलै महिन्यात २१ लाखांपेक्षा जास्त नवीन सदस्य नोंदणी केली असून, गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत यंदा ५ पूर्णांक ५५ शतांश टक्के वेतनपट वाढ झाल्याचं याबाबतच्या अहवालात म्हटलं आहे. यामधून रोजगाराच्या संधीत वाढ झाल्याचं आणि कर्मचाऱ्यांमध्ये आपल्याला मिळणाऱ्या लाभांबाबत अधिक जागरूकता निर्माण झाल्याचं स्पष्ट होत आहे.
यंदाच्या जुलै महिन्यात ९ लाखांपेक्षा जास्त नवीन सदस्यांनी ईपीएफओमध्ये नोंदणी केली असून, यामध्ये १८ ते २५ वयोगटातल्या सुमारे ५ लाख ९८ हजार सदस्यांचा समावेश आहे. तसंच यंदाच्या जुलै महिन्यात दोन लाखांपेक्षा जास्त नवीन महिला सदस्य ईपीएफओशी जोडल्या गेल्या, अशी माहिती कामगार आणि रोजगार मंत्रालयाने दिली.