September 18, 2025 8:16 PM | EPFO

printer

EPFOच्या सदस्यांना एकाच लॉगिनच्या माध्यमातून सेवांचा लाभ मिळणार

ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे सदस्य आता एकाच लॉगिनच्या माध्यमातून सर्व सेवांचा लाभ घेऊ शकणार आहे. कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी ही माहिती दिली आहे. या बदलामुळे वापरकर्त्यांच्या तक्रारी कमी होतील, पारदर्शकता वाढेल आणि सदस्यांना सुविधांचा लाभही सुलभतेने मिळू शकेल. यापूर्वीच्या दुहेरी लॉगिन प्रणालीमुळे याला विलंब होत होता, तसंच पासवर्ड संबंधित अडचणीही वाढल्या होत्या. त्यामुळे आता ईपीएफओनं सदस्यांसाठी पासबुक लाईट ही सेवा सुरू केली असून याद्वारे सदस्यांना पीएफची रक्कम, पैसे काढणं सोयीचं होणार आहे.