डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राज्यातही विविध कार्यक्रमांचं  आयोजित करण्यात आलं. या निमित्तानं मुंबईत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वातावरण बदलाबाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक प्रचार मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. एकदा वापरलं जाणारं प्लास्टिक पर्यावरणाचा सर्वात मोठा शत्रू असून याचा वापर थांबवणं हा पर्यावरण संवर्धनासाठीचा महत्वपूर्ण निर्णय असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. राज्य सरकारच्या १० कोटी वृक्षलागवड मोहिमेत नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी  केलं. 

 

   जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत मुंबईत गिरगाव चौपाटीवर एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक विरोधात मोहीम राबविण्यात आली. नवी मुंबईत सिडको व्यवस्थापकीय संचालकांच्या हस्ते जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आलं. रत्नागिरी इथंही वृक्षरोपण करण्यात आलं. एक पेड माँ के नाम उपक्रमात जिल्ह्यात २५ हजार झाडं लावण्याचं उद्दिष्ट ठरवण्यात आलं आहे. 

 

सोलापूर शहरात राबवल्या जाणाऱ्या १ लाख  वृक्षारोपण मोहिमेचा आज पर्यावरण दिनी प्रारंभ झाला. नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि महिला बचत गटांनी मोहिमेत सहभागी होवून वृक्षारोपण मोहीम लोकचळवळ बनवावं, असं आवाहन महापालिका आयुक्तांनी केलं.  

 

जळगाव शहरात आज पर्यावरण रक्षण जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी फलक आणि घोषणांद्वारे पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. 

 

छत्रपती संभाजी नगरमध्ये पर्यावरण जागरूकतेसाठी आयोजित केलेल्या सायकल रॅलीचं उदघाटन खासदार भागवत कराड यांनी केलं. 

 

अहिल्यानगर जिल्ह्यातल्या हिवरे बाजार इथल्या मातृस्मृती वनमंदिरात चौदाशे देशी वृक्षांच्या लागवडीच्या मोहिमेचा पर्यावरण दिनी प्रारंभ झाला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा