September 10, 2024 7:38 PM | Appa Salvi

printer

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार विजय तथा अप्पा साळवी यांचं निधन

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार विजय अर्थात अप्पा साळवी यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी रत्नागिरीतल्या मिरकरवाडा अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. काल रात्री त्यांचं वार्धक्यानं निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते. रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना रुजवण्यात आणि वाढवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. १९९५ ते १९९९ या काळात त्यांनी आमदार म्हणून, राजापूर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होत.