डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राज्यातही विविध ठिकाणी रोजगार मेळाव्याचं आयोजन

राज्यात मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये आज रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री मंत्री पियुष गोयल मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथलं रोजगार मेळाव्याला उपस्थित राहून १८९ नवनियुक्तांना नियुक्तीपत्रांचं वाटप केलं. हा दिवस फक्त नोकरी मिळण्याचा नाही, तर देशाच्या विकासात योगदान देण्याची सुवर्णसंधी आहे, असं ते यावेळी म्हणाले. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर इथून या कार्यक्रमात भाग घेतला आणि १४८ जणांना नियुक्तीपत्रं वितरित केली.

 

शासकीय नोकरी ही चांगली समाजसेवा तसंच देश सेवा करण्याची संधी समजून आपलं कर्तव्य योग्य पद्धतीनं पार पाडावं आणि त्यात यशस्वी व्हावं असं आवाहन त्यांनी यावळी नवनियुक्तांना केलं. पुण्यातल्या रोजगार मेळाव्यात नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते ११४ जणांना नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.