सामाजिक विमा सुरक्षा कवच प्रदान करण्यासाठी केंद्रसरकारची कामगार नावनोंदणी मोहीम

कामगारांना सामाजिक विमा सुरक्षा कवच प्रदान करण्याच्या हेतूनं केंद्रसरकारने कामगार नावनोंदणी मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार उद्योगमालकांनी/अभियोक्त्यांनी आपणहून आपल्याकडच्या पात्र कामगारांची नावं नोंदवायची आहेत. येत्या १ नोव्हेंबरपासून पुढच्या वर्षीच्या ३० एप्रिल पर्यंत ही मोहीम सुरु राहील. १ जुलै २०१७ पासून येत्या ३१ ऑक्टोबर पर्यंत नोकरीत असलेल्या सर्व कामगारांची नावनोंदणी या मोहिमेत करता येईल. या मोहिमेमुळे उद्योगमालकांनाही जुन्या नोंदी तपासून घेता येतील, असं केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने म्हटलं आहे.