भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेतील ‘समाजवादी’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’ हे शब्द आणीबाणीच्या काळात समाविष्ट करण्यात आले होते; ते कधीही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाचा भाग नव्हते, असं सांगत, याबाबत फेरविचार करावा असं आवाहन राष्ट्रीय स्वयंसवेक संघाचे सरचिटणीस दत्तात्रेय होसबाळे यांनी केलं आहे. आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त काल नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही या कार्यक्रमाला उपस्थित होते. आणीबाणी हा देशाच्या इतिहासातील एक काळा काळ होता आणि त्यामुळं लाखो लोकांना त्रास सहन करावा लागला, असं गडकरी यावेळी म्हणाले.