डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 21, 2025 7:09 PM | Indian | US

printer

अमेरिकेतल्या भारतीयांसाठी आपत्कालीन मदत क्रमांक जाहीर

H 1B व्हिसासाठी १ लाख डॉलर आकारण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेनंतर तातडीच्या मदतीची गरज असलेल्या भारतीयांसाठी अमेरिकेतल्या भारतीय दुतावासानं आपत्कालीन मदत क्रमांक जाहीर केला आहे.  

 

H 1B व्हिसासाठीची शुल्कवाढ ही फक्त नव्या अर्जदारांसाठी असून ही रक्कम फक्त एकदाच भरायची आहे, असं अमेरिकेतल्या व्हाईट हाऊसच्या माध्यम प्रवक्ता केरोलीन लीविट यांनी काल प्रसिद्ध केलेल्या निवेदनात स्पष्ट  केलं. H 1B व्हिसाचं शुल्क दोन ते पाच हजार अमेरिकन डॉलरवरून वाढवून ते १ लाख डॉलर करण्याच्या निर्णयामुळे अनेक कुटुंबांना फटका बसणार असून अमेरिकन प्रशासनानं याचा विचार करावा अशी प्रतिक्रिया भारतानं दिली होती. त्यानंतर अमेरिकेचं हे स्पष्टीकरण आलं आहे. जे H 1B व्हिसाधारक सध्या अमेरिकेबाहेर आहेत त्यांना एक लाख डॉलर भरण्याची आवश्यकता नाही, तसंच व्हिसाचं नूतनीकरण करण्यातही या निर्णयामुळे अडचण येणार नाही, असं लीविट यांनी समाजमाध्यमावरल्या पोस्टद्वारे सांगितलं.