डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांच्या हस्ते मुंबईतल्या एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालयात आय. टी. आय नामकरण सोहळा

केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री जयंत चौधरी यांच्या हस्ते आज मुंबईतल्या एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालयात आय. टी. आय मुंबईचा नामकरण सोहळा झाला. आता या संस्थेचे  नामकरण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असं केलं गेलं आहे. यानिमीत्तानं झालेल्या कार्यक्रमात पुणे, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, अमरावती आणि नागपूर नागपूर इथल्या संत गाडगेबाबा स्वच्छ भारत प्रबोधिनींचा प्रारंभही केला गेला.

 

देशातलं एकमेव कौशल्य विद्यापीठ महाराष्ट्रात असून, तिथं कौशल्ययुक्त शिक्षणाच्या माध्यमातून प्रत्यक्ष रोजगार देण्यावर भर दिला जाणं, ही अभिमानाची बाब असल्याचं ते म्हणाले. 

 

राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.