अमेरिकन उद्योगजक एलॉन मस्क यांनी काल ‘एक्स’वर ‘अमेरिका पार्टी’ या नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली. रिपब्लिकन्स आणि डेमॉक्रॅट्स या दोन पक्षांच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचा यामागचा उद्देश आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी मतभेद झाल्यानंतर काही दिवसांतच मस्क यांनी ही घोषणा केली. एलॉन मस्क यांचा जन्म अमेरिकेबाहेर झालेला असल्याने ते राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरू शकत नाहीत. या नव्या पक्षाचा नेता कोण असेल, तसंच अमेरिकेच्या निवडणूक यंत्रणेकडे या पक्षाची औपचारिक नोंदणी झाली आहे का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
Site Admin | July 6, 2025 1:13 PM | America Party | Elon musk
एलॉन मस्क यांची अमेरिका पार्टी या नव्या राजकीय पक्षाची घोषणा
